आपला मराठी नूतनवर्ष विशेषांक
तैवान मधील मराठी माणसांनी ऑनलाइन पद्धतीने एकत्र येऊन कला, साहित्य आणि संस्कृतिची देवाण-घेवाण करावी. हे साधण्यासाठी एक मंच म्हणून तैवान मराठी परिषद स्थापन केली आहे.
खरे पहिले तर अजून तरी नाही. मंडळींनी ठरवले तर हंगामी/कार्यक्रमपूरता/प्रासंगिक अध्यक्ष म्हणून कुणीतरी व्यक्ती जवाबदारी स्वीकारते.
सध्यातरी हे व्हेब-पेज आणि एक whatsApp ग्रुप ह्या माध्यमातून संपर्कात असतो.
वर्षातून एकदा प्रत्यक्ष भेटून संमेलन भरवायचे असा मानस आहे. करोना काळामुळे अजूनतरी हे शक्य झाले नाही. ऑनलाइन पद्धतीने साधारण ३-४ महिन्यांतून एकदा भेट होतेच.
सदस्य होण्यास कुठल्याही सोपस्कारची गरज नाही. आपण तैवान मधे आहात आणि आपल्याला मराठी बोलता-वाचता येत असेल तर आपण आपसूक परिषदेचे माननीय सभासद आहात.
WhatsApp ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला खालील ईमेल वर आपली माहिती तसेच कला,साहित्य किंवा संस्कृती ह्या पैकी कशात रुची आहे इत्यादि आपल्या भ्रमण ध्वनि-क्रमांकांसाहित कळवावे. आपल्याला ग्रुप मधे समाविष्ट केले जाईल.
taiwanmarathiparishad@gmail.com