तैवान मराठी परिषदेची सुरुवात इ.स. २०२० च्या अखेरीस विश्व मराठी परिषदेच्या ऑनलाइन संमेलनाच्या निमित्याने झाली. कला, साहित्य आणि संस्कृती तसेच उद्योजकता ह्या क्षेत्रांमध्ये मध्ये रुची असणारे काही निवडक मराठी भाषिक मंडळी पुढे आले आणि परिषदेची अनौपचारिक स्थापना झाली. पुढे चत्रै शुद्ध प्रतिपदेला, श्री शालिवाहन शेक १९४३, प्लव संवत्सराच्या आरंभी म्हणजेच इ.स. १३ एप्रिल २०२१ रोजी तैवान मराठी परिषदेची औपचारिक स्थापना करण्यात आली. ह्या मंगलमय प्रसंगी संभासदांनी "चैत्रपालवी - २०२१" मराठी नूतनवर्ष विशेषांक प्रसिद्ध केला.


भविष्यात असेच अनेक उपक्रम आयोजित करण्याच्या मानस आहे.